Thursday, November 25, 2010

उत्स्फ़ूर्तता पुलंची!!!

नमस्कार,

’बोलणं’ नेमकं, नेटकं, समोरच्याला सहजतेनं समजेल असं असणं ही सध्याच्या मार्केटिंगच्या जगात अत्यावश्यक बाब ठरू पाहतीय. शब्द निवडीतली स्वाभाविकता, शब्द मांडणीतील अनौपचारिकता, विचारांची स्पष्टता आणि क्वचित प्रसंगी उत्स्फ़ूर्तता हे सूत्र सांभाळलं, तर कुठल्याही वयोगटातल्या, कुठल्याही स्वभवधर्माच्या माणसांशी तुमचे संवादाचे सूर सहज जमतात. ’पुलं’नाही अनौपचारिक बोलीत बोलण्याची भट्टी झक्क जमली होती.


"तुम्हाला सांगतो..."म्हणत ते क्षणात समोरच्यांच्या हृदयात शिरत. अंगभूत उत्स्फ़ूर्तता, बारीक निरिक्षणशक्ती आणि मूळात माणसांची आवड आणि त्यांच्या आनंदात आनंद मानण्याची उपजत वृत्ती यामुळे शब्दांच्या खेळाचे ते अनभिषिक्त सम्राट राह्यले. आपण मंडळी अनेकदा त्यांच्य उत्स्फ़ूर्त उद्गारांनी खदखदलेले आहात. मला ’पुलं’ समवेत प्रावास करण्याचाही योग आला आणि साध्या साध्या गोष्टीतही त्यांनी केलेल्या शेरबाजीमध्ये डोकावणा-या ’खट्याळ-मिष्किल’ पुलंचे दर्शन घडले.


मॊरिशसहून परतत होतो. एअरपोर्टच्या ड्यूटी-फ़्री शॉपमध्ये पुल-सुनीताबाईंसमवेत मीही रेंगाळलो होतो. समोरच्या शो-केसमध्ये एक पैशांचं सुंदर लेदर पाकीट लटकवलेलं होतं. पुलंना ते पाकीट फ़ार आवडलं. त्यानी सेल्समनला विचारलं, "केवढ्याला?"
सेल्समननं जी किंमत सांगितली, ती ऎकताक्षणी पुलं क्षणात उद्गारले,
"अरे, मग पाकीटात काय ठेवू?"
------------------

4 comments:

  1. अभिनंदन... इतरांना बोलते करण्याच्या तुमच्या व्यवसायात आज तुम्हाला ब्लॉगने पुन्हा एकदा लिहीते केले. त्यामुळे तुमच्या आठवणींची आणि किश्शांची मेजवानी सतत आणि अगदी नियमितपणे मिऴेल, अशी अपेक्षा.

    आशिष चांदोरकर
    ashishchandorkar.blogspot.com

    ReplyDelete
  2. साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लॉगच्या रूपाने थेट-भेट होत राहणार हे फारच छान झालं. सर्व माध्यमे गाजवणारा संवादक हे बिरूद अधिक सार्थ होणार.


    उज्ज्वला बर्वे

    ReplyDelete
  3. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...... आणि ब्लॉग-जगात स्वागत .....
    आणि ६०+ (मी तुमच्या पेक्षा वयानी मोठी आहे ) ब्लॉगर समूहात तुमचे सहर्ष स्वागत !

    ReplyDelete
  4. Sudhir Gadgil Saheb - Aplyala 60 vya vadh divsachya hardik shubhechya - Wish you sound health - wealth follows, Ravi

    ReplyDelete