Thursday, November 25, 2010

नमनाचा ब्लॉग

नमस्कार,


बोलता बोलता मी आज वयाची ’साठी’ ओलांडली. आणि ’बोलणं’ हाच ’व्यवसाय’ म्हणून स्वीकारण्याची पस्तीशी पार केली. बोलणं आणि बोलकं करणं याचा एक दिवसही कंटाळा आला नाही. किंबहुना ’गप्पां’त रमणं ही मूळचीच आवड असल्यानं भोवताली गप्पिष्टांचं कोंडाळं जमत गेलं. बोलकं करण्याची हौस असल्यानं बोलण्यातून माणसं ’उलगडणं’ हीच दैनंदिनी बनली आणि देशभरच्या तीन हजार माणसांच्या मुलाखती घेण्याचा उच्चांक पार करत त्या माणसांच्या व्यक्तित्वातल्या वैविध्यपूर्ण पैलूंमुळे माझी दैनंदिनी कुठल्याही ’टॉनिक’शिवाय ताजीतवानी राह्यली.


बदलत्या काळाची बदलती शैली स्वीकारत गेल्यानं माणसं जोडण्याचा प्रवाह कायम राह्यला. वर्तमानपत्रं, साप्ताहिक, जाहिराती, रंगमंच, अनुबोधपट, गाणं, ध्वनीमुद्रण, दूरदर्शन, वाहिन्या, टॉक शो अशी माध्यमं हाताळता हाताळता, वयाच्या या टप्प्यावर सध्याच्या माध्यमाला सामोरा जातोय.’ब्लॉग’.


मयुरेश, प्रसाद, योगेश, नितीन, शैलेश या नव्या पीढीतल्या माध्यमातल्या मित्रांच्या सहकार्याने मी आता ’ब्लॉग’द्वारे तुम्हा मंडळींना भेटणार आहे. रोजच्या भटकंतीत भेटलेल्या अनोख्या मुद्रा टिपणार आहे. कधी या पूर्वी भेटलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ आठवणी, दुर्मिळ फ़ोटोंसह नोंदवणार आहे. ताज्या घडामोडींवर जुने संदर्भ जोडत माझी मनची टिप्पण्णी करणार आहे. अनपेक्षितपणे ताजतवाना करणारा अनोखा ’क्षण’ अनुभवला तर तो क्षण तुमच्याबरोबर शेअर करून, तुमच्या चार घटका प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार आहे. आधुनिक माध्यमात भेटतोय. काही चुकलं तर ’थेट’ कळवा. म्हणजे आपली परस्परांची ही ’थेट-भेट’ पारदर्शी होईल.
------------------------

6 comments:

  1. Happy 60th birthday! And welcome to the blogosphere. Looking forward to reading your articles here in this medium.

    Also, do consider joining twitter as well.

    Best regards,
    Amit Paranjape

    ReplyDelete
  2. माझी पहिली आठवण आहे दूरदर्शन वरचे मराठी संगीताचे कार्यक्रम जे तुम्ही सादर केले होते. त्यानंतर मुलाखती, बक्षीस समारंभ, व इतर विविध कार्यक्रम बघितले. प्रत्येक अनुभव आनंददायी होता. त्यात आता हे नवीन रूप म्हणजे जणूकाही गरम पुरणपोळीवर साजूक तूप.
    आता "चिवचिव" वर (म्हणजे Twitter वर) पण शिक्का मारायला काहीच हरकत नाही.

    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!

    Namita Waikar

    ReplyDelete
  3. Eka awliyane dusarya awliyacha parichay kela ahe. anand. aplahi parwas asacha New Face warun chalu rahanar yach adhik anand ahe. Puneri Bhasha ani saskurti ashich jagabhar mirwat rahanar ahe. ti hi tumachymule.

    subhash inamdar
    9552596276

    ReplyDelete
  4. नमस्कार , ब्लॉग विश्वात आपले मनापासुन स्वागत ...

    आपल्या येण्याने ब्लॉग विश्वाला चार चांद लागले आहेत असे म्हणायला हरकत नाही ....

    कधीही काहीही टेक्निकल मदत लागली तर जरुर सांगा ...

    जाता जाता - तुम्ही उत्तम लिहिता हे वेगळे सांगायला नकोच .. माझ्या ब्लॉगवर तुमच्या पुस्तकावर एक लेख लिहिलाय ..
    http://pvinayak.com/pustake/

    नजर टाका ....... प्लीज ...



    आपलाच ,

    (मराठी ब्लॉगर) विनायक

    ReplyDelete
  5. wish u belated happy birthday!!!

    welcome to the blogosphere......hv read ur books earlier....nw waiting to hv more thru this medium also

    prajakta joglekar, thane

    ReplyDelete
  6. नमस्कार,
    मी तुमचा लहानसा चाहता आहे. तुमचे लेखन व मुलाखत कधीच मिस होऊ देत नाही.
    आता ब्लोग वर आहात तर सहज तुमचे लेख वाचता येतील.
    तुमच्या ब्लोग आणि तुम्हाला अनेक शुभेच्छा.

    आपला
    सौरभ मखरे(नुमवीय)

    ReplyDelete